एम.व्ही.पी. समाजाचे

के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक

(के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य व ए.एम. विज्ञान महाविद्यालय.)

MVP SAMAJ'S

K.T.H.M. COLLEGE, Nashik

(K.R.T. Arts, B.H. Commerce and A.M. Science College.)

मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयात व्याख्यान-सर्व जग अनिश्चिततेच्या वाटेवर : राजकीय विश्लेषक जतीन देसाई

18/10/2026
 
नाशिक : आज जगात रशिया-युक्रेन, इस्राईल-इराण, पाकिस्तान-अफगाणिस्तान ही तीन युद्धे सुरु आहेत. यामध्ये सर्व जगाचे अतोनात नुकसान होत आहे. युद्ध सुरु करणे सोपे परंतु थांबवणे कठीण आहे. ज्यावेळी एखादे राष्ट्र युद्ध सुरु करते, ते जोपर्यंत जिंकत नाही, तोपर्यंत युद्ध थांबवू शकत नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातील संघर्षाचे परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागतात. त्यामुळे सर्व जग हे अनिश्चीततेच्या वाटेवर जात असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार व आंतरराष्ट्रीय राजकारणाचे विश्लेषक जतीन देसाई यांनी व्यक्त केले. मविप्रच्या केटीएचएम महाविद्यालयातील व्हीएलसी हॉल मध्ये शुक्रवारी (दि.२०) 'आंतरराष्ट्रीय संघर्ष' या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. 
 
यावेळी व्यासपीठावर मविप्रचे माजी सेवक संचालक डॉ. अशोक पिंगळे, प्रा. मिलिंद वाघ, मधुकर दुबे,.प्राचार्य डॉ. राजेंद्र सांगळे, प्राचार्य डॉ. कल्पना अहिरे, उपप्राचार्य प्रा. सोमनाथ शिरसाठ, आयक्यूएसी समन्वयक डॉ. शरद बिन्नोर उपस्थित होते.
      यावेळी ते म्हणाले, १९४७ साली पाक आणि अफगाणिस्तानमध्ये ड्यूरांड लाईन झाली. त्यामुळे पाकिस्तानातील कुर्द समाज हा विखुरला गेला. अमेरिका पाकिस्तानने निर्माण केलेला तालिबान हा भारतासाठी दहशतवादाच्या दृष्टीने देखील घातक ठरत आहे. फेब्रुवारी २०२६ पासून अफगानिस्तानने पाकिस्तानवर हल्ला सुरु ठेवला असून, यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान होत आहे. जगात सुरु असलेल्या युद्धांमुळे शाळा व हॉस्पिटल लक्ष्य केले जात आहेत. या हत्यांच्या विरोधात सर्वांनी एकत्र आवाज उठवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ अशोक पिंगळे यांनी ‘अन्न, वस्र, निवारा, आरोग्य व शिक्षण या गरजांकडे दुर्लक्ष झाले तरी चालेल; मात्र प्रत्येकाने स्वतःमधील चेतना जागृत ठेवावी, असे सांगितले.
 
प्रास्ताविकात प्राचार्या डॉ. कल्पना अहिरे यांनी ‘जगामध्ये आंतरराष्ट्रीय घडामोडी व संघर्ष होत आहे, या संघर्षाचे परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. डॉ. तुषार पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. योगेशकुमार होले यांनी आभार मानले.
-----------------------
*युद्धामुळे दररोज अडीच लाख अब्ज डॉलर खर्च*
इस्राइल आणि इराण युद्धात रोजचा अडीच लाख अब्ज डॉलर खर्च होत असून, अमेरिकाही १ अब्ज डॉलर खर्च करीत आहेत. मेयर फॉर पीस या जागतिक संघटनेने सर्व जगातील देशांना संरक्षणावरील खर्चात दरवर्षी ५ टक्के कपात करावी, असे आवाहन केले आहे.
 
by -
 
Download :  Download
 
Visitor Number:

Label Designed and Developed by - Computer Science Department